श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
गेवराई दि 6 ( वार्तांहार )
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी केले.
गेवराई तालुक्यातील वसाहत बागपिंपळगाव येथील श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9वी व 10वी वर्गातील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, भागवत सोळुंके, अंजली माने, मुक्ताबाई मोटे, नवनाथ घुगे, हरीभाऊ आघाव, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सर्व 15 वर्षी विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावे असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...