पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या हिताची पत्रकारीता करावी – ह.भ.प. दिलीप बाबा घोगे.

सामाजिक उपक्रमाने ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा’ ‘दर्पण दिन’ उत्साहात साजरा.

                   गेवराई दि. 6 ( वार्तांहार ) 

पत्रकार बांधवांनी सर्वसामान्यांच्या हिताची पत्रकारीता करून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे असे. असे प्रतिपादन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप बाबा घोगे यांनी ‘दर्पण’ दिनानिमित्त बोलताना केले.

यावेळी ह.भ.प. दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुढे बोलताना ह.भ.प. दिलीप बाबा घोगे म्हणाले की पत्रकार बांधवांनी समाज हित डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असतानाच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार बांधवांनी करावे. असे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे चिंते श्वर संस्थान गेवराई येथे गोशाळेतील मुक्या जनावरांना चारा वाटपाचा कार्यक्रम करत ‘दर्पण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सहयोग बॅंकेचे चेअरमन डिगांबर टेकाळे, सावता परिषदचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे, शहराध्यक्ष प्रदीप जोशी, संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पोपळे, उपाध्यक्ष राजेंद्र नाटकर, भागवत देशपांडे, संपादक अमोल वैद्य, संपादक शिवाजी ढाकणे, तुळशीराम वाघमारे, अविनाश इंगावले, विनायक उबाळे, अनिल अंगुडे, नितीन वाकडे, प्रा. रामहरी काकडे, सचिन नाटकर, दत्ता झेंडेकर, अरविंद कुलकर्णी, राम म्हेत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *