April 19, 2025

श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

                    गेवराई दि 3 ( वार्तांहार )
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत सोमवार दि.3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत अंजली माने, श्रीमती मुक्ता मोटे, भागवत सोळुंके आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी सचिन माळी, प्रतीक्षा टेहळे, दिपाली माळी, साक्षी देवकते, कल्याणी गोरे ,आदिती नाईक, शरद माळी ,मंगल कुराडे, शालू माळी, परमेश्वर देवकते, अश्विनी देवकते, यशोदा बनगर ,प्रसाद बाबर , अस्मिता मुगुटराव ,योगिता सगळे, मुस्कान शेख, सानिका अंदाजे, संध्या चितळकर, दिपाली बेद्रे, सानिया पठाण, निखिल मुगुटराव ,सगळे योगेश यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर यशोदा बनगर हिने अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत अस्मिता मुगुटराव राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत योगिता सगळे झाशीची राणी यांच्या वेशभूषेत वैष्णवी पोपटे इंदिरा गांधी यांच्या वेशभूषेत गौरी मुगुटराव अरुणिमा सिन्हा यांच्या वेशभूषेत वंदना माळी सानिया मिर्झा यांच्या वेशभूषेत मुस्कान शेख झाशीची राणी आरती मगरे सुनीता विल्यम्स यांच्या वेशभूषेत अश्विनी देवकते आदींनी वेशभूषा परिधान करून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच रेखा माळी, शालू माळी व वैष्णवी देवकते तसेच साक्षी देवकते, आदिती नाईक, कल्याणी गोरे या विद्यार्थीनी गीत सादर केले. यावेळी मुक्ता मोटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुराव घुले यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रम पार पडण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना माळी व मुस्कान शेख या विद्यार्थ्यांनीने केले. कार्यक्रमाचे आभार मुक्ता मोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर येवलेकर, नवनाथ घुगे, हरीभाऊ आघाव, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *