गेवराई शहरातील इरा स्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून स्कूल डे साजरा करण्यात आला. यावेळी सावित्री च्या लेकी शिक्षिका बनल्या होत्या. तर अनेक विद्यार्थीनीनी विविध क्षेत्रातील नामवंत व यशस्वी महिलांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
गेवराई शहरातील जातेगाव रोड येथील इरा स्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्या अश्विनी कुलकर्णी या होत्या. तर व्यासपीठावर प्रेमला कुलकर्णी, विठ्ठल शिंगणे यांची उपस्थिती होती. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अश्विनी कुलकर्णी, प्रेमाला कुलकर्णी, विठ्ठल शिंगणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. विद्यार्थीनीनी विविध क्षेत्रातील नामवंत व यशस्वी महिलांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी नी आपल्या वेशभूषेतील महिलेची माहिती व्यासपीठावर येऊन आपल्या शब्दात मांडली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनीनी सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, साहिना नेहवाल, सानिया मिर्झा, किरण बेदी, कल्पना चावला, सिंध्दुताई सपकाळ आदी शूरवीर महिलांच्या वेषभूषा परिधान करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर स्कूल डे साजरा केला. यावेळी वर्ग नववी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले . यावेळी या सर्व कार्यक्रमा विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साह दिसून आला. त्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी थोरबोले यांनी तर आभार प्रदर्शन वंदना खोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...