April 19, 2025

तलवाडा या ठिकाणी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 

             तलवाडा दि 3 ( वार्ताहार ) 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील राजमाता जिजाऊ सचिवालय सभागृह या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन समता परिषदेचे गेवराई तालुकाउपाध्यक्ष – गणेश काळे यांनी भव्यदिव्य स्वरूपात केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्वरिता अर्बन बँकेच्या चेअरमन – सौ.अनिताताई विजयकुमार डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू तात्या हात्ते हे उपस्थित होते.

जयंतीनिमित्त सर्वप्रथम राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महिलांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले. त्यानंतर कु.वेदांती यमुनादास शिंगणे, कु.वैष्णवी मोहन शिंगणे, माऊली डोंगरे, रवि मरकड, अमोल मरकड, दादाराव रोकडे, प्रा.शाम कुंड, हभप गणेश महाराज कचरे, विजयकुमार डोंगरे सर आदींनी मोलाचे विचार व्यक्त करून सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिमुकल्या बालिकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती. विठ्ठल – रुक्मिणी बचत गट व संत सावता महिला बचत गट यांच्या वतीने शाळकरी मुलींना वही व पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच आज्जूशेठ सौदागर, माजी सभापती गिताराम डोंगरे, डिपीआयचे मदन हातागळे, मोहन डोंगरे, संत रविदास प्रतिष्ठानचे संस्थापक – तुळशीराम वाघमारे, कृष्णा उर्फ पिन्टूशेठ गर्जे, शिवसेनेचे शेख रफिकभाई, अशोक शिंदे, रमेश नाटकर, पत्रकार शेख आतिख, अशोक सुरासे, विष्णू राठोड, बापू गाडेकर, मोहन डोंगरे, साहेबा कु-हाडे, वामन रोकडे यांच्यासह महिला व मुली यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यमूनादास शिंगणे यांनी तर सूत्रसंचालन मदन काळे सर व आभार प्रदर्शन धोंडिबा हातागळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *