कलाविष्कार प्रतिष्ठानचे गेवराई भुषण पुरस्कार जाहिर
गेवराई दि 3 ( वार्ताहार )
गेवराई तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गेवराई भूषण पुरस्कारासह, 11 गेवराई रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक तथा सहारा अनाथालयाचे संचालक संतोष गर्जे यांना या वर्षीचा “गेवराई भूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 11 जणांची गेवराई रत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
गेल्या 7 वर्षापासून, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त दि 12 जानेवारी रोजी कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारांची घोषणा दि 2 जानेवारी रोजी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे यांनी केली आहे. यात ज्येष्ठ समाजसेवक, सहारा अनाथालयाचे संचालक संतोष गर्जे यांना यावर्षीचा गेवराई भूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रतिकूल परिस्थितीत गेवराई तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गेवराई रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ज्येष्ठ रंगकर्मी तथा नाट्यकलावंत प्रा बापू घोक्षे यांना कलारत्न, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना पोलिसरत्न, पत्रकार अय्युब बागवान, कलावंत पत्रकार सुनील मुंढे यांना पत्रकाररत्न, समाजसेवक तथा पोलीस जमादार रंजित पवार यांना समाजरत्न, कोरोना रुग्णांना सेवा देणारे डॉ अनिल दाभाडे, डॉ अशोक काळे यांना आरोग्यरत्न, सौ सीता महासाहेब यांना पर्यावरण रत्न, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे महेश बेदरे यांना कृषिरत्न, सौ राणी पवार- राठोड यांना क्रीडा रत्न तर शिक्षण क्षेत्रातील सौ सविता ढाकणे यांना शिक्षणरत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. गेवराई भूषण पुरस्कारांसह, 11 गेवराई रत्न पुरस्कार अशा एकूण 12 पुरस्कारांचे वितरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून, लवकरच वितरित करण्यात येणार असून, यावेळी युवावक्ता राहुल गिरी यांचाही हृद्यसत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे यांनी दिली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य नारायण झेंडेकर, एकनाथ लाड, संतोष कोठेकर, शिवप्रसाद आडाळे, गणेश मिटकर, सचिन पुणेकर, गजानन चौकटे, गणेश माने, राम महासाहेब, सौ आशाताई शिंदे, सौ स्वाती कोठेकर, सौ ज्योतिताई झेंडेकर, सौ सीता महासाहेब, सौ रेणुकाताई मिटकर, सौ रोहिनीताई आडाळे, सौ प्रियंकाताई पुणेकर, सौ माधुरिताई चौकटे, सौ कविताताई लाड, सौ अवंतिकाताई माने यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...