January 22, 2025

तूमची ईच्छा असेल त्यातच करिकर करा – रणविर पंडित 

गढीच्या अध्यापक महाविद्यालयात समाजसेवा शिबीर व क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

        गेवराई दि 3 ( वार्ताहार ) 

शिकवत असताना आपण शिकत असतो ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण सतत ज्ञान घेत राहीले पाहिजे. शिक्षण घेत असताना आपण आपली जिवनावशक आणि समाज उपयोगी कामे केली पाहिजेत यातूनच आपली जडणघडण होत असते. तुमची ईच्छा ज्यात आहेत त्याच क्षेत्रात करिअर करा असे प्रतिपादन युवानेते रणविर अमरसिंह पंडित यांनी केले. शिवाजीनगर गढी येथील जयभवानी अध्यापक महाविद्यालयात आयोजित केलेल्या समाजसेवा शिबिराचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

शिवाजीनगर गढी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अध्यापक महाविद्यालयत समाजसेवा शिबीर व क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या समाजसेवा शिबिराचा शुभारंभ युवानेते रणविर पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन मासाळ, प्राचार्य व्हि.पी.राठोड, डॉ. बलराज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रणविर पंडित यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच युवकांना खेळाचे महत्त्व सांगून क्रीडा क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. मासाळ यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवा शिबीरा बाबत माहिती दिली. यावेळी प्राचार्य व्हि.पी. राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *