कांकुचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले गेवराई चे माजी उपनगराध्यक्ष आझम खॉ पठाण यांच्या निधनाने मला धक्का बसला असून क्षिरसागर परिवार पठाण कुटुंबियांच्या पाठीशी खबीर पणे उभे असल्याचे प्रतिपादन बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले.
गेवराई चे माजी उपनगराध्यक्ष आझम खॉ पठाण यांच्या निधनाचे वृत समजताच बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीररसागर यांनी पठाण यांच्या निवास्थानी भेट देवून त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी बोलताना डॉ क्षीरसागर म्हणाले की आझम खॉ पठाण हे माझ्या मातोश्री केशर काकूचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.सन 1974-75 मध्ये भारत देशाचे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी च्या काळात मी बीड जिल्हा युवक कॉग्रेस चा अध्यक्ष असतांना पठाण यांची गेवराई तालूका अध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली होती.शेवटच्या काळात पठाण हे आजारी असतांना त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केले.क्षीररसागर परिवार आझम खॉ पठाण यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खबीर पणे उभे असून त्यांना कोण त्याच गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी आजम खॉ पठाण यांचे चिरंजीव मोअज्जम पठाण ,अक्रम पठाण ,जब्बार पठाण,माजी नगरसेवक सय्यद नजीब जेष्ठ पत्रकार काझी अमान ,जूनेद बागवान,रशिद कुरेशी आदी उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...