January 22, 2025

अवैध वाळू वाहतूकीवर मोठी कार्यवाई ; आठ ट्रॅक्टर एक रोटर सह पाच केन्या जप्त

तहसिलदार सचिन खाडे यांची सिंगम कार्यवाई

                       गेवराई दि 31 ( वार्ताहार )
गेल्या काही दिवसांपासुन गेवराईचे तहसिलदार रजेवर होते याच दरम्यान खामगाव परिसरातील एका व्यक्तीला वाळुच्या ट्रॅक्टर चिरडले होते याठिकाणी जिल्हाधीकारी यांनी सुद्धा भेट दिली होती आज सकाळी आपल्या कर्तव्यावर रुजू होताच तहसिलदार सचिन खाडे यांनी मोठी कार्यवाई केली आहे यामध्ये राक्षसभूवन , म्हाळजपिंपळगाव या ठिकाणावरूण एक कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , तहसिलदार सचिन खाडे कालच रूजू झाले आहेत त्यांनी आज सकाळी तहसिल कार्यलयात सगळ्या तलाठी आणि मंडळ अधीकारी यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती या बैठक संपल्यानंतर सगळे तलाठी आणि मंडळ यांना घेऊन तहसिलदार सचिन खाडे वाळू माफियांना पकडण्यासाठी रवाना झाले होते .यामध्ये दोन टिम बनवण्यात आल्या होत्या एक टिम तहसिलदार सचिन खाडे तर दुसरी टीम नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्या नियत्रांनाखाली होती या दोन्ही सकाळी अकरा वाजण्यादरम्यान रवाना झाल्या होत्या पण हे कोठे गेले याची माहिती नव्हती परंतू राक्षस भूवन व म्हाळजपिंपळगाव या ठिकाणावरूण आठ ट्रॅक्टर , पाच वाळू उपसा करण्याच्या केन्या , आणि एक रोटर असा एकूण मीळून एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली असुन या सर्व वाहनावर दंडात्मक कार्यवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे सदरची कार्यवाई तसिलदार सचिन खाडे , नायब तहसिलदार प्रशांत जाधवर सह सर्व मंडळ अधीकारी , तलाठी , कोतवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *