पती कडून पत्नीचा निर्घृण खुन ; तालुक्यातील खांडवी येथील घटना
गेवराई दि 31 ( वार्ताहार ) तालुक्यातील खांडवी गावात रहिवासी असलेल्या एका वयोवृद्ध पतीकडून आपल्याच पत्नीची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना (आज दि 31 वार शुक्रवारी ) पहाटे घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , संजिवनी पिराजी शेजूळ ( वय 55 वर्ष ) असे खुन झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव असुन तिचा पती पिराजी यांने कु-हाडीने वार करूण आपल्या पत्नीची हत्या केली आहे तसेच वरिल ईसम हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते परंतू यावर उपचार सुरू नव्हते अशी ही माहिती आहे तसेच गेवराई पोलिसांनी घटनास्तळावर धाव घेतली असुन लवकर हा खुन किरकोळ कारणाने झाला असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे तसेच आरोपी पती याने पत्नीला डोक्यात कु-हाड मारून ठार केले असल्याचे देखील गेवराई पोलिसांनी सांगितले असुन या प्रकरणी मयताचा मुलगा यांच्या फिर्यादीवरूण गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे तसेच घनस्तळावर पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , डीबी पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे , पो हे विठ्ठल देशमुख , बीट आमलदार अशोक सोनवणे ,यांनी धाव घेतली आहे तसेच आरोपीला अटक करूण पंचनामा , करूण मृत्युदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात आनला आहे .