January 22, 2025

युवकावर धारधार शस्राने वार ; प्रकृती चिंताजनक

                गेवराई दि 28 ( वार्ताहार )
गेवराई शहरा लगत असना-या  कोल्हेर पाटाजवळच्या परिसरात एका युवकावर तिश्न हत्याराने वार केल्याची घटना साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली मात्र अंधाराचा फायदा उचलुन या युवकावर सपासप पोटावर तिश्न हत्याराने वार करण्यात आले आहेत दरम्यान जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या युवकाने आपल्यावरिल हल्याची माहिती गेवराई पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्तळावर धाव घेत या युवकाला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करूण बीड जिल्हा रुग्णलयात हलवले असुन या युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरानी दिली असुन या युवकांचे नाव रवि पवार ( वय 30 वर्ष ) असल्याचे समजते  परंतू यावर हल्ला कुणी व का ? केला याचा तपास पोलिस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *