माध्यमिक विद्यालय घोगस पारगांव येथे शास्त्रज्ञ जोहान्स केप्लर व लुई पाश्चर यांची जयंती साजरी
गेवराई : दि 28 ( वार्ताहार ) जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय घोगस पारगांव ता.शिरुर कासार या शाळेत थोरशास्त्रज्ञ जोहान्स केप्लर व लुई पाश्चर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जागर शास्त्रज्ञाचा या उपक्रमांतर्गत जयंती कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक टकले बाबुराव पांडुरंग तर प्रमुख वक्ते म्हणून विज्ञान विषयाचे शिक्षक खेडकर धर्मराज रामकृष्ण सह आदि उपस्थित होते. त्यांनी जोहान्स केप्लर यांनी केलेल्या खगोल संशोधनात ग्रहांच्या परिभ्रमण याबद्दल व पिसाळलेल्या कुत्र्यांचा लसीवरील उहापोह केला. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक टकले यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञाविषयी मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखेच असतात पण जिद्द व कठोर परिश्रमाने ते जागतिक कीर्तीचे असामान्य विभूती बनतात तेव्हा विद्यार्थ्यांनीही आपण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ बनू शकतो असा ध्यास घ्यायला हवा व स्वतःच्या संशोधक वृत्तीला चालना द्यायला हवी असे शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला आर.बी खेडकर, हिंगे एस. व्हि, साबळे आर.ए, जरांगे बी.एम, चव्हाण एम.डी, खेडकर के.बी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी परिश्रम घेतले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...