
अवैध वाळू वाहतूकीमुळे निधन झालेल्या कुटूंबियाचं पुनर्वसन करूण दोषी अधीकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा
वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांचे जिल्हाधीकारी यांना निवेदन
गेवराई दि २८ ( वार्ताहार )
तालुक्यात गेल्या वर्षभरात वाळु तस्करीमुळे ९ ते १० व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. यास सर्वस्वी वाळु माफिया व संबंधित अधिकारी जबाबदार आहे. निसर्गाची व पर्यावरणाची हानी करुन शासनाचा महसुल बुडवत, संघटीत गुंडगिरी, दहशत करत वाळु चोरी करतात. सर्वसामान्यांनी वाळु उपसा व वाहतूकीस विरोध केला तर वाळू माफिया त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करतात. असाच काहिसा प्रकार दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या महिंबा निमगाव येथे अशोक कातखडे यांनी वाळुमाफीया विरोधात तक्रार देऊन अंदोलन केले तसेच ट्रॅक्टर पकडून दिल्याचा राग मनात धरून ८ ते १० वाळु माफियांनी कातखडे यांच्या घरावर तलवार, चाकू, लाठ्यांसह प्राणघातक हल्ला केला.
वाळु माफिया दादागिरी व दहशत करत ट्रॅक्टर, ट्रक, टिप्पर, हायवाद्वारे नॅशनल हायवेसह रहदारीच्या वस्तीतून ताशी १०० ते १२० अशा भरधाव वेगाने अवैध वाळु वाहतुक करत असल्याने गेवराई तालुक्यात वाळु माफियांची मोठी दहशत माजली असून नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध वाळूची भरधाव वेगात चोरटी वाहतूक करत असल्याने अत्तापर्यंत चिरडून दोघांचा तर अवैध वाळु उपश्यामुळे गोदापात्रात बुडून ८ व्यक्तींना प्राण गमवावे लागले, यात कोणी कुटुंब प्रमुख होते तर कोणी कुटुंबातील कमवता व्यक्ती होते यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर आले आहे. तरी ज्यांचा अवैध वाळु उपसा व भरधाव वेगातील अवैध वाळु वाहतुकीमुळे मृत्यु झाला त्या मयताच्या कुटुंबियांना अर्थीक मदत करुन त्यांचे पुनर्वसन करावे.
तसेच अवैध वाळु उपसा व वाहतुकीस जबाबदार असलेले गेवराईचे तहसिलदार, नायब तहसीलदार,सबंधीत वाळु पट्यातील मंडळ अधिकारी व तलाठी, पोलिस अधिकारी कर्मचारी, वाहतुक पोलिस, महामार्ग पोलिस, तसेच पर्यावरण विभागातील यांच्यातील ज्यांचा सबंध येतो अशा दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
१० व्यक्तींच्या मृत्यूस तसेच वाळु माफियांची वाढती दहशत,दादागिरी, गुंडगिरी, संघटीत गुन्हेगारीला सबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. याचे कारण गेवराई तालुक्यातील जनतेला माहीत आहे कि अधिकारी, कर्मचारी हप्ते घेतात तसेच इतरांच्या नावावर स्वत:चे ट्रॅक्टर, टिप्पर, हायवद्वारे अवैध व चोरटी वाळू वाहतूक करतात. याच्या पुराव्यासाठी गेवराई शहरातील सिसिटीव्ही व पाडळसिंगी टोलनाक्यावरील सिसिटीव्ही कॅमेरे तपासावेत हे कॅमेरेच सर्वात मोठा पुरावा आहे.
दुसऱ्या पुरव्यासाठी सबंधीत अधिकारी यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावा. त्यांच्या स्थावर मालमत्तेची व नातेवाईकांची चौकशी करावी. सबंधीत अधिकारी यांच्याकडे करोडोंची मालमत्ता असून हि केवळ हप्ते वसूली व अवैध धंद्यांमुळेच आहे, यांच्यावर वरिष्ठ पातळीवरील चौकशी नेमून ईनकम टॅक्सची चौकशी करुन, मालमत्ता जप्त करुन निलंबित करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
तसेच अत्तापर्यंत वाळु प्रकरणातून ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत तसेच ९ ते १० व्यक्तींच्या मृत्यूस जे संघटीत गुन्हेगार वाळुमाफीया जिम्मेदार आहेत त्यांच्या विरोधात भादवी कलम ३०२,३०७ आणि तडीपार करुन मोक्का कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाही करत तुरुंगात डांबावे. त्यासह वाळूची होणारी चोरी थांबावी नसता १५ दिवसानंतर लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी तिव्र स्वरुपाचे अंदोलन करेल याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल असे वंचित बहुजन आघाडीच्यावतिने तालुकाध्यक्ष पप्पु गायकवाड, महासचिव किशोर भोले, प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले यांच्या स्वाक्षरीच्या दि. २८ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कळवले आहे
वाळु माफियासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा.
वाळु माफियांविरोधात ३०२,३०७ कलमसह मोक्का अंतर्गत तसेच सहकार्य करनाऱ्या महसूल, पोलिस,ट्रॉफिक पोलिस, नॅशनल हायवे पोलिस, पर्यावरण विभागातील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करत फौजदारी गुन्हे दाखल करावीत अशी वंचित बहुजन आघाडीच्यावतिने गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली.