वाळू तस्करीत आणखी एक बळी ; वाळुच्या ट्रॅक्टरने एकास चिरडले 

गेवराई तालुक्यातील खांमगाव येथील घटना

                     गेवराई दि 27 ( वार्ताहार )

तालुक्यातील खांमगाव शिवारातून ट्रॅक्टर व्दारे अनाधीकृत वाळू उपसा करूण त्यांची तस्करी केली जाते यामध्ये दुपारी एकच्या वेळी अनाधीकृत ट्रॅक्टर एकाला जोराची धडक दिली यात एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे मात्र आत्तापर्यंतच्या वाळू तस्करीत हा नऊवा बळी आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गावांकडून गेवराई कडे येत असतांना अनाधीकृत वाळू वाहतूक करणा-या ट्रॅक्टरने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दुचाकीवर स्वार असणारा ईसम तुकाराम बाबूराव निंबाळकर ( वय 42 वर्ष ) असे या मयताचे नाव असुन काही काळ याठिकाणी तनावाचे वातावरण निर्माण झाले होते गांवकरी यांनी याबाबद आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर प्रेत ठेऊन ठिय्या अंदोलनास सुरूवात केली असल्याची माहिती असुन घटनास्तळावर पोलिस प्रशासन हजर झाले आहे . आत्तापर्यंत गेवराई तालुक्यात वाळूच्या गाड्यामुळे चिरडून मरणारे यांची संख्या नऊ वर गेली आहे याबाबद प्रशासन काही ठोस पाऊले का ? उचलत नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे .तसेच याठिकाणी सुरू असलेलं आंदोलन पोलिस प्रशासनाचा विनंतीवरूण थांबण्यात आले असुन मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे

      मृत्युदेह ताब्यात घेण्यासाठी नकार

उत्तरीय तपासणी साठी मयताचे शव गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात आनले होते .त्याठिकाणी मयताच्या नातेवाईक यांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला तसेच या अवैध वाळू तस्करीला जबाबदार असना-या महसुल मधील तलाठी व नायब तहसिलदार यांना निलंबीत करा अशी मागणी यावेळी करण्यात येत होती दरम्यान गेवराई पोलिसांनी सदरचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले असल्याची माहिती असुन चालक अद्याप फरार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *