गेवराई तालुका निर्भीड पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर
अध्यक्षपदी अमोल कापसे तर शहरअध्यक्ष पदी शेख हारूण
गेवराई दि 26 ( वार्ताहार )
गेवराई तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांनी महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संधाची कार्यकारणी जाहिर केली असुन आज गेवराई विश्रामगृह याठिकाणी बोलावलेल्या बैठकीत नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत यामध्ये अध्यक्षपदी अमोल कापसे , शहर अध्यक्ष पदी शेख हारूण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली आहे. निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार तर प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब यांच्या शिफारसीनुसार तर जिल्हाध्यक्ष देवेंद्र ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली,ही निवड करण्यात आली. यावेळी गेवराई तालुका अध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्षपदी शेख हारून यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी गेवराई , तालुका उपाध्यक्षपदी शेख सलमान, तालुका सचिव पदी विष्णू राठोड,तालुका कोषाध्यक्षपदी शेख अमीन, तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घाडगे,तालुका संघटक पदी विशाल कापसे,तालुका सहसंघटक पदी अशोक मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी समीर सौदागर, तर शहर उपाध्यक्षपदी शेख उस्मान, शहर सचिवपदी शेख सलीम ,तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड.पवन लाहोटी, यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार राम रुकर, खदिर बागवान यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी च्या सदस्यपदी भाऊसाहेब महानोर,असलम कादरी, शुभम घोडके,अंगद गावडे, सय्यद कौसर,जावेद शेख,सचिन डोंगरे, यांची निवड करण्यात आली
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...