April 19, 2025

 

 

सुमंत रुईकर याचं निधन

                  बीडः दि 26 ( वार्ताहार ) 

येथील कट्टर शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुमंत रूईकर यांचे शनिवारी सायंकाळच्या सुमारास निधन झाले ते 45 वर्षांचे होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने रूईकर यांनी बीड ते तिरूपती बालाजी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रवाशा दरम्यानच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला.

रूईकर यांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेभागी असणार्‍या सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार सर्व पक्षांमध्ये होता. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्ती म्हणून रूईकर यांच्याकडे पाहिले जात होते. रूईकर कुटूंबियांच्या दुःखात आंदोलन परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *