खुन करून पुरावा नष्ट केला ; बेपत्ता अशोक चव्हाण प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे विषेश न्यायालयाचे आदेश

              बीड दि 19 ( वार्ताहार )
गेवराई तालुक्यातील उमापुर रहिवासी असलेला ईसम त्यांच्या नातेवाईक यांना भेटण्यासाठी गेला परंतू तो परत आलाच नाही त्यांंचा मृत्युदेह तिर्थापूरीच्या कॅनोल मध्ये दिसुन आला मात्र अद्याप पर्यंत त्यांचे शव सापडले नाही पाचोड पोलिसांत या प्रकरणी मिसींगची तक्रार देण्यात आली मात्र या मयताच्या पत्नीने न्यायालयाचे दार ठोठवले आणि औंरगाबादच्या विषेश न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाचोड पोलिसांना दिले आहेत .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , मयत अशोक सुदाम चव्हाण हा दि 28 मे 2020 रोजी आपल्या नातेवाईक यांना भेटण्यासाठी विठ्ठल नगर पैठण याठिकाणी गेला होता मात्र त्याला पत्नीने मोबाईलवर संपर्क केला असता त्यांने फोन उचलला व आरोपी बाबू अश्रूबा मोरे यांच्या शेतात आहे आणि त्यांची पाण्याची मोटर खराब झाली आहे ती दुरूस्त करून येतो असे सांगितले त्यानंतर लगेचच बाबू मोरे याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत हा मी त्याला रात्री नऊ वाजेपर्यंत पाठवतो असे सांगितले.

परंतू त्यादिवशी तो घरी पोहचला नाहीच नातेवाई यांच्याकडे चौकशी केली परंतू त्या ठिकाणी देखील तो मिळून आला नाही तसेच आरोपी बाबू मोरे यांच्या बाबद संशय बळावला आणि त्यानेच अशोकच्या जिवाचे बरे वाईट केले आसवे असे चौकशी केल्यानंतर खात्री करून पाचोड पोलिसांत हा सगळा घटना क्रम सांगितला परंतू पोलिसांनी खुनाचा गुन्हा व अॅट्रॉसिटी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतू असे न करता मिसींगची नोंद घेण्यात आली परंतू पलिसांनी याबाबद अधिक तपास केला नाही परंतू तिर्थापुरीच्या एका पत्रकारे पाटातून एक प्रेत वाहून जात आहे आणि त्यांचे हातापाय बांधले असल्याचे फोटो उमापुर येथील एका पत्रकाराला पाठवले आणि त्या पत्रकाराने हा अशोकच आहे त्या फोटावरून ओळखले आणि लगेच त्यांने त्यांच्या पत्नीला सांगितले व ते सगळेजन तिर्थापुरीकडे रवाना झाले मात्र त्याठिकाणी पोहचल्या नंतर आजूबाजू चौकशी केली असता याठिकाणावून पाण्यात हातपाय बांधलेला मृत्यूदेह त्यांनी पाहिला व त्यांच्या अंगात निळ्या रंगाचे बनियान होते .असे समजल्यानंतर अशोकच्या पत्नीने पोलिस अधीक्षक औंरगाबादच्या यांना लेखी तक्रार सादर केली. परंतू काहीच झाले नाही.

म्हणून औंरगाबादच्या विषेश न्यायालयात कलम 156 ( 3 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकणावर युक्तीवाद ऐकून विषेश न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देष पाचोड पोलिसांना दिले आहेत  पिडीतेची बाजू अॅड किशोर सी डोंगरे यांनी मांडली तर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉयर फार्मचे अॅड सिदार्थ शिंदे व अॅड भगवान कांडेकर यांनी मार्गदर्शन केले .तसेच पिडीतेला न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांनी मदत केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *