गेवराई दि 18 ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागात रहिवासी असलेला तसेच गेवराई न्यायलयाच्या आवारात चहाचे हॉटेल व्यावसाय करणारा अब्बास यांने शहरातील अनेक नागरिकांचे लाखों रूपये घेऊन गेल्या तिन दिवसांपासुन पसार झाला आहे यामुळे संपुर्ण शहरात या कारनाम्याने खळबळ उडाली आहे .
गेल्या चाळीस वर्षापासुन संजय नगर भागात रहिवासी असलेला शेख आब्बास यांंच न्यायालय परिसरात अनेक वर्षापासुन चहा चे हॉटेलचा व्यायसाय होता या व्यावसायात चांगले उत्पन्न देखील मिळायचे परंतू लॉकडाऊन नंतर हॉटेलचा व्यावसाय अडचणीत आला होता याच कारणाने त्याने अनेक लोकांकडून हातऊसने पैसे घेतले घर दुकान शेती यावर लाखों रूपयाचे कर्ज त्याने काढले होते विषेश म्हणजे व्यावहार आला की व्याजही आले याच कर्जाच्या डोंगर ऐवढा वाढला त्याने यातून अनेक लोकांची त्याने फसवणूक देखील केली परंतू गेल्या तिन दिवसांपुर्वी चहाचे हॉटेल अचानक बंद झाल्यानं परिसरात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या संजय नगर मध्ये रहिवासी असलेल्या महिला याच्या नावावर भारत फायनस या सह वेगवळ्या मल्टीस्टेट बँकेतून अनेक लोकांचा नावावर बनावट कागदपत्रे तयार करून याठिकाणाहून देखील त्यांने लाखों रूपये उकळले आहेत अशी माहिती आहे चहा च्या हॉटेलचे वेगवेगळ्या लोकांना स्टॅपवर नोट-या मारून त्यांने दिल्या आहेत हाच प्रकार त्यांने राहत्या घरात देखील केला आहे घरही अनेकांच्या नावे स्टॅप नोट-या करूण दिल्यानं अनेकजनांची फसवणूक करूण लाखों रूपयाचा गंडा त्याने अनेकांना घातला असल्याने खळबळ उडाली आहे तो आपल्या परिवारासोबत कुठे गेला ? याची कल्पना कुनालाच नाही परंतू या अब्बासचा कारनामा ऐकून अनेकजन आश्चर्यव्यक्त करत आहेत या प्रकरणी अद्याप तरी एकही तक्रारदार यांने पोलिसांत धाव घेतलेली नाही .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...