अट्टल महाविद्यालयाच्या डॉ. वृषाली गव्हाणे यांना पेटंट मजुंर 

              गेवराई, दि. 16 ( वार्ताहार ) 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या रसायशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वृषाली सोमनाथ गव्हाणे यांना Plant Disease Detection using image processing techniques याकरिता भारतीय पेटंट मंजूर करण्यात आले आहे. या विषयासाठी महाविद्यालयास हे सलग दुसरे पेटंट आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या गुणवत्तचा लौकिक सर्वदूर पसरल्याचे मत शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत. सदरील संशोधनाच्या पेटंट बद्दल डॉ. गव्हाणे यांचा अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी शिखरे यांनी अभिनंदन करून सत्कार केला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष मा.आ.अमरसिंह पंडित, सरचिटणीस आ.सतीश चव्हाण तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील सत्कार प्रसंगी उपप्राचार्य मेजर डॉ. विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ.प्रशांत पांगरीकर सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल सर्वांनी डॉ.वृषाली गव्हाणे यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *