
तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ
मुंबई:दि 12 ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं असतं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे. जनतेने हे लक्षात घ्यायला आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे ते जनतेने समजून घ्यावा. त्यामुळे भाजपला धडा शिकवला पाहिजे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
