ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी नितीन करीर यांच्याहस्ते शारदा अकॅडमीचा होणार शुभारंभ
अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराईत साकारतेय स्पर्धा परिक्षा केंद्र
गेवराई, दि.१२ ः- गेवराई तालुका अधिकार्यांचा तालुका’ होण्यासाठी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शहरात मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र साकारत आहे. शारदा अकॅडमीकडून सुरु होत असलेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या शुभहस्ते सोमवार, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय गेवराई येथे होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
गेवराई सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असतानाही केवळ अपुर्या साधन सामुग्रीमुळे त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता येत नाही, ही बाब ओळखून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. शारदा प्रतिष्ठान आणि र.भ.अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा अकॅडमीच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र साकारत आहे. या केंद्राचा शुभारंभ राज्याचे महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या शुभहस्ते सोमवार, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. याप्रसंगी बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे आकर्षण स्पर्धा परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांना नेहमीच असते. त्यामुळे माजी आ.अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात राज्यातील नामांकित प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरु केला आहे.
असा विश्वास लोक व्यक्त करत आहेत.सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोईंयुक्त अभ्यासिका, विद्यार्थीनींसाठी वसतीगृह, तज्ञ मार्गदर्शक यांसह अनेक सुविधा गेवराई शहरात यानिमित्ताने उपलब्ध होणार आहेत. गेवराई सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून पोषक वातावरण आणि साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून केला जात आहे. या उपक्रमामुळे नक्कीच गेवराई तालुक्यात भविष्यात अधिकारी तयार होतील
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...