गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गेल्या चार दिवसामपु्र्वी नाकझरी शिवारात शेतात पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांंजेवार यांना लागली त्यांनी अचानक या ठिकाणी धाड टाकली या ठिकाणी उपस्थित असनारे विस ते पंचविस जन पोलिसांना चकवा देऊन पळाले व त्या ठिकाणावरून 90 हजार रूपये जप्त करूण 11 मोटारसायकल व 4 फोरविलर गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या व गुन्हा दाखल केला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , घटनास्तळावर मोठी रक्कम होती मात्र गुन्ह्यात कमी रक्कम पोलिसांनी दाखवली अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती मात्र या प्रकरणात अद्याप एकालाही अटक करण्यात आली नाही कारण आरोपीची नावे निष्पन्न नाहित म्हणून या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्रे आवळली आहेत या ठिकाणी केलेल्या धाडसत्रात ज्या गाड्या सापडल्या आहेत याबाबद आरटीओला पत्रव्यव्हार करण्यात आला आहे यामध्ये मालकांची नावे येणार असुन यामध्ये अनेक गेवराई शहरातील तसेच राजकीय कार्यकर्ते यांची नावे येण्याची शक्यता आहे .तश्या हालचाली पोलिस प्रशासनात सुरू आहेत तसेच वाहन मालकच यात आरोपी होतील असे तपास अधिकारी डिबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...