कोविड लसीकरणाचे १०० टक्‍के उद्दीष्‍ट पुर्ण करण्‍यासाठी निवडणुकप्रमाणे लसीकरण पथकांची स्थापना

तहसिलदार सचिन खाडे यांची माहिती

गेवराई दि 10 ( वार्ताहार ) आज वार शुक्रवार रोजी मा. जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती प्राधिकरण यांचे आदेशावरुन तहसिल कार्यालय गेवराई येथे तालुका स्‍तरावरील सर्व यंत्रणेचे खातेप्रमुख व अधिकारी कर्मचारी यांची तहसिलदार गेवराई तथा अध्‍यक्ष तालुका आपत्‍ती व्‍यवस्‍थापन गेवराई यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक आयोजित करण्‍यात आली होती.

गेवराई तालुक्‍यामधील सर्व नागरीकांचे १००% कोव्‍हीड लसीकरणहोण्‍याचे उद्दीष्‍ट पुर्तीचे नियोजन करुन दिनांक ११/१२/२०२१ वार शनिवार पासून तालुक्‍यातील १२ महसुल मंडळातील ४० गावे, तदनंतर दिनांक १२/१२/२०२१ रोजी १३ महसूल मंडळातील ४० गांवामध्‍ये ग्रामस्‍तरीय तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच , पोलिस पाटील , मुख्‍याध्‍ययापक व त्‍यांचे अधिनिस्‍त सर्व शिक्षक, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार, सेतू केंद्र चालक, आशासेविका यांना सकाळी ०७.०० वाजलेपासून ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत लसीकरण करुन घेणेबाबतचे नियोजन केलेले आहे. त्‍यामध्‍ये पुढील गावांचा समावेश आहे.

चकलांबा, ब्रम्‍हगांव, अर्धपिंपरी, महारटाकळी, शेकटा, नागझरी, देवकी, संगमजळगांव, रेवकी, बागपिंपळगांव, डोईफोडवाडी, भोगलगांव, गंगावाडी, पाडळसिंगी, शिराळा, दगडगांव, आहेर वाहेगांव, सुशी वडगांव, टाकळगांव, जव्‍हारवाडी, चिखली, साठेवाडी, तांदळा, ईटकुर, पांढरवाडी, तपेनिमगांव, लोणाळातांडा, सिंधफणाचिंचोली, गावखोरतांडा, खोरीतांडा, कोलतेवाडी, खेर्डा बु., हिंगणगांव, भाट आंतरवली, उदाचातांडा, रामनगर (कुंभेजळगांवतांडा), पांचाळेश्‍वर, गौंडगांव, पाथरवाला बु., मालेगांव बु. इत्‍यादी गांवे.

वरील गावांमध्‍ये ज्‍या नागरीकांनी अद्याप लस घेतलेली नाही त्‍यांना लसीकरण करुन, घेण्‍यासाठी प्रवृत्‍त करण्‍याचे काम ग्रामस्‍तरीय यंञणेकडून होणार आहे. यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी महसूल मंडळ निहाय झोनल अधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आलेल्‍या आहेत. यामध्‍ये जे नागरीक स्‍थलांतरीत आहेत त्‍यांची वेगळी नोंद तयार करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आलेले आहेत. गेवराई तालुक्‍यामध्‍ये व शहरांमध्‍ये सर्व दुकानदार व इतर सर्व आस्‍थापना यांना मा.जिल्‍हाधिकारी बीड यांचे आदेशान्‍वये सर्व आस्‍थापना चालक, दुकानदार, दुकानामध्‍ये कामकरणारा कामगार वर्ग या सर्वांचे तसेच त्‍यांच्‍या कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे लस घेतलेबाबतचे प्रमाणपत्र दुकानात सोबत ठेवावेत किंवा ज्‍यांनी लस घेतली नाही त्‍यांनी तात्‍काळ लस घ्‍यावी अन्‍यथा सदरचे दुकान आस्‍थापना सील करणेबाबत व दंडात्‍मक कार्यवाही करणेबाबतची कारवाई अनुसरली जाईल असे तहसिलदार गेवराई, मुख्‍यधिकारी नगरपरिषद गेवराई यांनी सांगितले. तसेच जे नागरिक लस घेणेबाबत टाळाटाळ करतील त्‍यांचेवर साथरोग प्रतिबंध नियम कायदयामधित तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र ठरतील त्‍यामुळे सर्व नागरीकांनी कोव्‍हीडची संभाव्‍य तिसरी लाट रोखण्‍यासाठी आपले व आपले कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे लसीकरण करुन घ्‍यावे असे अवाहन तहसिलदार गेवराई यांनी केले आहे.

सदर बैठकीस, तहसिलदार गेवराई, गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई, तालुका आरोग्‍य अधिकारी, मुख्‍याधिकारी नगरपरिषद गेवराई, तालुका कृषी अधिकारी गेवराई व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *