April 19, 2025

एकअधीकार शाहिच्या विरोधात वंचित लढा उभारणार

पत्रकार परिषदेत वंचितचे तालुका अध्यक्ष पप्पू गायवाड  यांनी सत्ताधीकारी यांना धरले धारेवर

गेवराई दि 10 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात तसेच गेवराई नगर परिषदेत काय ? चाललयं हे आम्हाला स्पष्ट कळतयं आपल्याच घराच्या आवती भोवती विकास केला व गेवराईत गेल्या पंदरा वर्षापासुन एकअधीकार शाहि तसेच हम करे सौ कायदा अशी भूमिका या ठिकाणची आहे यामूळे येण्या-या कार्यकाळात वंचित या सगळ्या भूमिकेविरोधात आवाज उठवनार असल्याचे मत वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी व्यक्त केले आहे .

शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते याठिकाणी बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे , सुदेश पोतदार , भीमराव चव्हाण , किशोर भोले , रेवन गायकवाड , कृष्णा खेडकर , किशोर चव्हाण , बाबासाहेब शरणांगत , सुनिल धोतरे , यांची उपस्थिती होती .
वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची धोरनं वंचित बाबद जो बहूजन समाजातील वंचित घटक आहे त्या समुहाला सत्तेच्या ओघात नेणं हा मुळ अंजेडा वंचित आघाडीचा आहे तसेच बीड जिल्ह्यात पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगर परिषद , नगर पंचायत , ग्रामपंचायत निवडणुका वंचित स्वबळावर लढणार आहे भाजप , शिवसेना ,राष्ट्रवादी , हे पक्ष सोडून समविचारी पक्षासोबत वंचित स्थानिक पातळीवर निवडणुका पक्ष्याला विचारात घेऊन लढेल तसेच एम आय एम सोबत युतीचा प्रश्न येत नाही तसेच शेतकरी , एसटी कामगार , यांच्यावर सरकार जाणिव पुर्वक अन्याय करत आहे स्थानिक पातळीवर पंडित -पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा समाचार घेतला नगर परिषद जिल्हा परिषद , या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे नागरिकांनी या बाबद यांनी वंचित कडे लेखी तक्रारी सादर कराव्यात असे अवाहनही त्यांनी नागरिकांना केले तसेच या सगळ्या विरोधात निवडणुकीत पुराव्यानिशी न्यायालयातही जाऊ अशी रोखठोक भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली याठिकाणी अजय खरात , प्रतिक खरात , प्रकाश राठोड , राजू गायकवाड सह पत्रकार बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *