राजमाता जिजाऊ व अहिल्याबाई होळकर विद्यालयात
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गेवराई दि 9 ( वार्ताहार  ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर रोजी शोभा देवी महिला सेवाभावी संस्थेच्या रानमळा येथील राजमाता जिजाऊ विद्यालय आणि खांडवी येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात प्रशासकीय अधिकारी प्रमोद देसले यांच्यासह शिक्षकांनी विनम्र अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्याच नेतृत्वात भारताच्या राज्यघटनेची निर्मिती झाली. 6 डिसेंबर 1956 साली या महामानवाने अखेरचा श्वास घेतला. त्यांना या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त राजमाता जिजाऊ विद्यालय रानमळा येथे शोभादेवी महिला सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याध्यापक प्रमोद देसले, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष दिनकर शिंदे, मनोज मोरे, अशोकराव कराड, मुकुंद वाघमारे, अभिमान डोंगरदिवे, प्रल्हाद आडाळे, राजेश घल्लाळ, आप्पासाहेब शिंदे, प्रल्हाद कोकाट, गोरखराव हिंगे, काशिनाथ भोले, मदन जाधव, बाबासाहेब हिंगे, अशोक नागटिळक. यांनी अभिवादन केले. तर अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी ता गेवराई येथे डॉ आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून, शोभा देवी महिला सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा राजमाता जिजाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देसले यांनी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव दिनकर शिंदे, मुख्याध्यापक केशव तळेकर, बाबासाहेब ढाकणे, अर्जुन धुमाळ, मोहन हिंगे, मनोज मोरे, दत्तात्रेय सकुंडे, किसन बांगर, भोजने सर, शेंबडे पाटील सर, भगवान मोरे, गणेश भोले, शेख इकबाल आदींनी अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *