April 19, 2025

ना पेट्रोल-डिझेल, ना CNG, ना बॅटरी, मग नितीन गडकरींची नवी कार कशावर चालते? काय आहे खास?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. इंधनाच्या इतर पर्यायांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता पेट्रोल-डिझेलपासून सुटका करुन घेतली आहे.

नागपूर दि 5 ( वार्ताहार )  : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. इंधनाच्या इतर पर्यायांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता पेट्रोल-डिझेलपासून सुटका करुन घेतली आहे. त्यांनी नुकतीच नवीन कार घेतली आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर चालत नाही. गडकरींची नवीन कार हायड्रोजन इंधनावर चालते. गडकरी म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत ही कार वापरणार आहोत, जेणेकरून लोकांना हायड्रोजन कारवर विश्वास बसेल.नितीन गडकरी नेहमीच पेट्रोलचा वापर कमी करण्याबाबत बोलत असतात. नजीकच्या काळात भारत पेट्रोलवर कमी अवलंबून राहायला हवा, असे त्यांचे मत आहे. यासाठी ते अनेकदा वेगवेगळ्या इंधन पर्यायांबद्दल बोलत असतात. सांडपाणी आणि शहरातील कचऱ्यापासून बनवलेल्या ग्रीन हायड्रोजनवर बस, ट्रक आणि कार चालवण्याची त्यांची योजना आहे. 2 डिसेंबर रोजी 6 व्या राष्ट्रीय आर्थिक समावेशन शिखर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी गडकरींचा पुढाकारत्याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या नवीन कारची घोषणाही केली. गडकरींनी पायलट प्रोजेक्ट कार खरेदी केली आहे. ही कार फरिदाबाद येथील ऑइल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विकसित केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर चालते. हायड्रोजन इंधनाबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी गडकरी दिल्लीत या कारचा वापर करणार आहेत. कार कंपन्यांसाठी फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य करण्याचा आदेश येत्या दोन-तीन दिवसांत जारी केला जाईल, असे गडकरी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले होते. फ्लेक्स-फ्यूल इंजिन असलेल्या कार एकापेक्षा जास्त इंधनाचा वापरु करु शकतात.पेट्रोलियम आयात कमी करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणारभारत दरवर्षी 8 लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. गडकरींनी या आठवड्यात एका कार्यक्रमात सांगितले होते की, जर भारत पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून असेल तर येत्या पाच वर्षांत आयात बिल 25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. “मी येत्या दोन ते तीन दिवसांत पेट्रोलियम आयात कमी करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहे. या अंतर्गत कार उत्पादकांना फ्लेक्स-फ्यूल इंजिन असलेल्या कार आणाव्या लागतील,’ असे गडकरी म्हणाले होते.गडकरी स्वतः हायड्रोजनवर चालणारी कार वापरणारआता गडकरींनी स्वतः हायड्रोजनवर चालणारी कार घेतली असून ते स्वतः ती कार वापरणार आहेत. पर्यायी इंधनाबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न स्वत: गडकरी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *