आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते १७ कोटी रुपये
किंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभ

कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

गेवराई, दि.२१ (वार्ताहार ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणला असून १७ कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी होणार असून या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जयदिप औटी, बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, गेवराई बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, माजी जि.प.सदस्य गणपतराव डोईफोडे, माजी सभापती पांडुरंग कोळेकर, माजी उपसभापती डॉ.आसाराम मराठे, माजी उपसभापती सोमनाथ माने, माजी सभापती मुजीब पठाण, तांडा समृध्दी योजनेचे विभागीय सदस्य सुंदरसिंग राठोड, आत्मतिर्थ देवस्थाने अध्यक्ष रविंद्र कोठी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघात आ.विजयसिंह पंडित यांच्याहस्ते १७ कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. यांमध्ये मौजे कुक्कडगाव, ता.बीड येथे पूर संरक्षक भिंत करणे, मौजे औरंगपूर, ता.बीड येथे पूर संरक्षण भिंत करणे, मौजे ईटकुर, ता.गेवराई येथे पुर संरक्षण भिंत करणे, श्री क्षेत्र पांचाळेश्वर, ता.गेवराई येथे तिर्थक्षेत्र विकास कामे करणे, मौजे राजापूर, ता.गेवराई येथे विविध विकास कामे करणे अशा एकुण १७ कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे.

शनिवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी मौजे कुक्कडगाव येथे सकाळी १०.३० वाजता, मौजे औरंगपूर येथे सकाळी ११ वाजता, मौजे ईटकुर येथे दुपारी १२ वाजता, मौजे राजापूर येथे दुपारी ३ वाजता तर मौजे पांचाळेश्वर येथे दुपारी ४ वाजता आ. विजयसिंह पंडित यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *