गेवराई दि 7 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत अनाधीकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गून्हे शाखेला मिळाली होती तसेच सदर ठिकाणी छापा मारून दोन वाळूने भरलेली वाहने यावर स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाने कार्यवाई केली आहे व या प्रकरणी 50 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्याकाही दिवसांपासून वाळू तस्करीत चकलांबा पोलिस ठाण्याचा कारभार हा वादग्रस्त चाललेला आहे तसेच ठाणेदार यांच्यावर वरिष्ठाचा अंकूश नसल्याचे दिसून येत आहे तसेच चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगाव परिसरात अवैध वाळूची तस्करी केली जाते याची माहिती स्थानिक गून्हे शाखेला मिळते परंतू स्थानिक ठाणेदार याला ही माहिती नसते ही शोकातींका आहे बोरगाव परिसरात ( दि 5 रोजी ) रात्री 8 वाजेच्या सुमारास स्थानिक गून्हे शाखेच्या टिमने पाठलाग करून दोन वाळूने भरलेले हायवा जप्त केले आहेत यामध्ये 50 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे गून्हा दाखल केला असून पूढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत तसेच अनाधीकृत वाळू उपस्याला जबाबदार असनाऱ्या ठाणेदार यांची उचलबांगली करावी अशी चर्चा होऊ लागली आहे.तसेच ही कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,स्थानिक गून्हे शाखेचे पोनि शिवाजी बंन्टेवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर,यादव,सलगर,राठोड,वरपे आदिंनी केली आहे.