गेवराईत व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

गेवराई : दि 6( वार्ताहार )मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा होणारा दर्पण दिन यावर्षी गेवराई शहरात सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने येथील कै. भगवानराव ढोबळे मुकबधीर व मतिमंद निवासी विद्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार विजयसिंह पंडित, डिवायएसपी अनिल कटके, शिवसेना प्रमुख उध्दव मडके यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर विद्यालयातील मुकबधीर व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवित वह्या, पेन, शैक्षणिक शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पत्रकारितेचा खरा अर्थ केवळ बातम्या देणे नसून समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हाच आहे. अशा उपक्रमांमुळे पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेला बळ मिळते, असेही मत व्यक्त उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडिया बीड जिल्हा उपाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. सुनील मुंडे यांनी केले, आभार भास्कर सोळुंके यांनी मानले. दरम्यान दर्पनदिनाचे औचित्य साधून अनेकांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी, सदस्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडिया बीड जिल्हा उपाध्यक्ष विनोद नरसाळे, भागवत जाधव, तालुकाध्यक्ष विनोद पौळ, सचिव, सुनील मुंडे, सुशील टकले, भारत सोळुंके, तुकाराम धस, उपाध्यक्ष विष्णू गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश राजगुरू, वैजिनाथ जाधव, सचिन डोंगरे, कामराज चाळक, आर.आर.बहिर, अजहर इनामदार, शेख आतिखभाई, अण्णासाहेब राठोड, शेख आसेफ, शेख यासीन, रविराज कुटे, अमोल इनामदार, विनायक उबाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *