द मिडीया व्हॉईस पत्रकार संघाचे कार्य कौतूकास्पद – अनिल कटके

खऱ्या गरजवतांना आधार – महेश दाभाडे

गेवराई दि 6 ( वार्ताहार ) संपुर्ण महाराष्ट्र भरात आज आचार्य बाळसास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच अनेक पत्रकार बांधव हा दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात तसेच याच दर्पण दिनानिमित्त द मिडीया व्हॉईस पत्रकार संघाने मंतिमंद 50 विद्यार्थी यांना गणवेश वाटप करून साजरा केला आहे तसेच या कार्यक्रमाला संबोधित करताना गेवराई उपविभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल कटके म्हणाले की गेवराईत द मिडीया व्हॉईस पत्रकार संघाने अतिषय कौतूकास्पद आहे तसेच खऱ्या गरवतांना आधार देण्याचे काम या पत्रकार संघाचे आहे असे मत मा नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांनी मांडले आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की, दर्पण दिना निमित्त कै भगवाराव ढोबळे मुकबधिर व मंतीमंद निवासी विद्यालय याठिकाणी असनाऱ्या 50 विद्यार्थी यांना शालेय गणवेश व खाऊचे वाटपाचा कार्यक्रम आज ( दि 6 जानेवारी ) रोजी वरील ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपिठावर गेवराई उप विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल कटके,माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे,शिवसेना ( शिंदे गट ) उद्धव मडके, द मिडीया व्हॉईस अध्यक्ष अविनाश इंगावले,उपाध्यक्ष सूभाष शिंदे,कार्यध्यक्ष शेख जावेद सर ,सचिव सोमनाथ मोटे,विनोद पौळ,भागवत जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला सबोधित करतांना उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके म्हणाले की दर्पण दिन हा पत्रकार यांचा आहे मानाचा उत्सव आहे त्यांनी लोकशाही बळकट ठेवली व वेळोवेळी कायद्याचे भान ठेवून आदर्श पत्रकारीता या द मिडीया व्हॉईस पत्रकार संघाने केली तसेच समाजाती वंचित घटक असलेल्या या विद्यार्थी यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व कौतूकास्पद कामगिरी केली असल्याने अतिषय चांगला उपक्रम राबवला असून यांचे कार्य माझ्या हातून घडले यांचा मला मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच गेवराईचे माजी नगरअध्यक्ष महेश दाभाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आज दर्पण दिन आहे हा लोकशाही ने दिलेला चौथ्या आधार स्तंभाचा उत्सव आहे आपण हा साजारा केला पाहिजे द मिडीया व्हॉईस पत्रकार संघाने गरजू व खऱ्या समाजतील घटकांना न्याय देण्याचं काम केले आहे व आधार देण्याचा त्यांचा संक्लप चांगला आहे यानिमित्ताने सर्व पत्रकार बांधव यांना दर्पण दिनाच्या त्यांनी सुभेच्छा दिल्या तसेच याठिकाणी सय्यद बादशाह,शेख फेरोज,शेख जफर,शेख अन्सार,शेख खाजा,शेख अफसर,अमोल भांगे,देवराज कोळे,गणेश ढाकणे,ईम्राण सौदागर,सुभम घोडके,सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *