गेवराईत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगर सेवक व पतीला मारहान
भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राडा
गेवराई दि २२ ( वार्ताहार ) नगर पालिकेचा निकाल जाहिर झाल्यानंतर गेवराईतील प्रभाग क्रं ४ मधिल राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार यांचा विजय झाला तसेच रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान भाजपाच्या चार कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित नगर सेवक सौ संगिता घोडके व पती दादासाहेब घोडके यांना मारहान केल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती असून याबाबद गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,नगर पालिका निकाल जाहिर झाल्यानंतर गेवराई शहरातील प्रभाग क्रं ४ मध्ये सौ संगिता दादासाहेब घोडके व पती दादासाहेब हे प्रभागातील नागरिकांना भेटण्यासाठी घरातच थांबले होते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान भाजपाचा माजी नगर सेवक यांचा भाऊ व अन्य तिन लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार यांच्या घरात घूसून चार जणांनी नगर सेवक त्यांच्या पतीला जबर मारहान केली आहे या घटनेमुळे संपुर्ण परिसरात भितीचे वातावर निर्माण झाले आहे तसेच हे कुटूंब भयभीत झाले आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.