पोलिसांनी दाखल केलेल्या गून्ह्यात बाळराजे पवार यांना अटक

2 डिंसेबर मतदान सुरू असताना पंडित – पवार गट एकमेकांना भिडले होते

गेवराई दि १६ ( वार्ताहार ) नगर परिषद निवडणूकी साठी मतदान प्रक्रीया सुरू असताना प्रभाग क्रंमाक १० मधिल उर्दू शाळा या बूथ केंद्रावर पंडित – पवार गटात जंगी राडा झाला होता तसेच मा आ अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना ही कृष्णाई या निवास स्थानावर जाऊन बाळराजे पवार व काही समर्थकानी मारहान केली होती तसेच त्यानंतर माजी आ लक्ष्मण पवार यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती सदर प्रकरणात गेवराई पोलिसांनी सुमोटू नूसार फिर्याद दाखल केली होती तसेच या गूरनं ७१७/२०२५ गून्ह्यात ३३३ हे अतिरिक्त कलम वाढले आहे व या प्रकरणात ५० पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी कायदेशीर कार्यवाई करूण अटक व सुटका केली आहे पण या प्रकरणात बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी ( दि १६ डिंसेबर ) रोजी  मध्यरात्री २ :२४ वाजता अटक केली असल्याची माहिती आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषदेची निवडणूक पंडित – पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती तसेच प्रचार दरम्यान वादग्रस्त विधाने व मतदार यांना धमकीवजा भाष्य केल्या प्रकरणी भाजपाच्या उमेदवार यांची देखील तक्रार निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे तसेच ( दि २ डिंसेबर ) रोजी नगर परिषदेसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्रंमाक १० मधिल उर्दूशाळेतील बूथवर पंडित – पवार यांचे युवराज एकमेकांना भिडले होते त्यांनतर कृष्णाई या निवास स्थानात सहाय्यक अमृत डावकर यांना मारहान त्यानंतर पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक व चार ते पाच लोकांना यामध्ये गंभीर ईजा झाल्या होत्या यामध्ये संकेत कांडेकर व यांची देखील वेगळी फिर्यात दाखल आहे तसेच पवारांचे समर्थक विष्णू आतकरे यांच्यावर हा गून्हा आहे तसेच या घटनेत विष्णू आतकरे हे देखील गंभीर जखमी आहेत यानंतर पंडित – पवार यांच्या कार्यकर्त्यात सोशल मिडीयावर जूगलबंदी करण्यात आली होती या सगळ्या प्रकरणात बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी कायदेशीर व कठोर पारदर्शक भूमिका बजावली तसेच या गून्ह्यात अतिरिक्त कलम वाढविले असल्याने गेवराई पोलिसांनी बाळराजे पवार यांच्यासह काही समर्थक यांना रात्री उशीरा हजर केले व त्यांना गेवराई न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *