मत मोजणी दरम्यान कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास हद्दपारीची कार्यवाई
बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांचे गेवराई प्रशासनाला आदेश
गेवराई दि 6 ( वार्ताहार ) नगर पालिका मतदान प्रक्रीये दिवशी ज्या लोकांनी कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांनी त्यांच्या विरूद्ध गून्हा दाखल केला आहे तसेच काही लोकांना नोटीस देऊन समज दिली आहे तसेच मत मोजणी दरम्यान कोणीही कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अश्या ईसमाविरूद्ध हद्दपारीची कार्यवाई करण्यात येईल असे आदेश बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी गेवराईच्या ठाणे प्रमुखांना दिले आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर पालिकेच्या निवडणूक मतदानाच्या दिवशी गेवराई शहरात पंडित – पवार समर्थकात वाद झाला तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजन कायदा व सुवैस्था प्रश्न निर्माण करणाऱ्या अश्या व्यक्तीवर सायबर सेलची करडी नजर आहे वादग्रस्त किंवा चिंतवणीखोर पोस्ट तसेच दोन समाजात व दोन गटात वाद होईल अश्या पोस्ट आढळल्यास पोलिस प्रशासना कडून कडक कार्यवाई करण्यात येणार आहे तसेच गेवराई पोलिसांनी दाखल केलेल्या सुमोटू गून्ह्यात 21 आरोपी यांची नोटीसवर सुटका करण्यात आली आहे उर्वरित पोलिस तपासात तसेच व प्रसार माध्यम व सोशल मिडीया वर व्हॉयरल झालेल्या व्हिडीओ क्लिप अधारे 30 आरोपींना निष्पन्न करूण त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कार्यवाई करण्यात आलेली आहे तसेच ( दि 21 डिंसेबर ) रोजी मतमोजणी दरम्यान कोणीही कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अश्या व्यक्ती विरूद्ध हद्दपारीची कार्यवाई करण्यात येईल असे आदेश बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी गेवराई पोलिस प्रशासनाला दिले आहेत.