मा आ. अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचला होता

स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्या विधानाने खळबळ

 

गेवराई दि 3 ( वार्ताहार ) काल ( दि 2 डिंसेबर ) रोजी गेवराई नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रीया सुरू असतांना प्रभाग क्रंमाक 10 मधिल उर्दू शाळेच्या बूथवर पंडित – पवार यांचे युवराज आपसात भिडले तसेच या सर्व प्रकारात मा आ अमरसिंह पंडित यांचे स्विय सहाय्यक अमृत डावकर यांना कुणी?मारहान केली यावर कुठेही वाच्याता नव्हती परंतू मला स्वत;बाळराजे पवार यांनी मारहान केली आहे तसेच त्यांच्या सोबत गूंड प्रवृतीचे चार ते पाच लोक होते तसेच ते मा आ अमरसिंह पंडित याचा खून करण्याच्या उद्देशाने आले होते असा दावा स्विय साहय्यक अमृत डावकर यांनी केल्यानं खळबळ माजली आहे.

या बाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषद निवडणूक जाहिर झाल्यापासून भाजपाचे सर्वच नेते मंडळी दादागिरी ची भाषणे करत होते व त्याच्या सोशलमिडीयावर क्लिप देखील शेयर करत होते या संपुर्ण प्रकारमध्ये काल ( दि 2 डिंसेबर ) रोजी नगर परिषदेसाठी शांततेत मतदान प्रक्रीया सुरू असताना दूपारी एक वाजण्याच्या दरम्यान पंडित – पवार यांचे युवराज प्रभाग क्रंमाक 10 मधिल उर्दू शाळेच्या बूथवर भिडले नंतर माजी आ लक्ष्मण पवार यांच्या निवास्थानावर दगडफेक झाली पुन्हा जयसिंह पंडित आणि माजी आ लक्ष्मण पवार हे एकमेकांना भिडले या प्रकरणी गेवराई पोलिसांनी 50 ते 60 जणांविरूद्ध गून्हे दाखल केले आहेत

तसेच मा आ अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई कार्यलया समोर उभा असलेल्या एका स्कॉर्पिओ कारला बाळराजे पवार यांनी घडक दिली त्यांचा आवाज ऐकूण स्विय सहाय्यक अमृत डावकर बाहेर आले त्यानंतर बाळराजे पवार यांनी मा आ अमरसिंह पंडित यांच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व कार्यलयात घूसले स्विय साहय्यक यांनी ते याठिकाणी नाहीत म्हटल्यानंतर त्यांना ही जबर मारहान केली असा दावा स्विय सहाय्यक अमृत डावकर यांनी केला आहे तसेच ते लोक मा आ अमरसिंह पंडित यांचा खून करण्याच्या ईराद्याने आले होते असा दावा डावकर यांनी केला असल्याने गेवराई तालुक्यात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिस काय? कार्यवाई करतात हे पहाणे महत्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *