गेवराई दि 2 ( वार्ताहार ) आज रोजी मतदान सुरू असतांना पंडित व पवार यांच्यात जोरदार राडा पहायला मिळाला तसेच किरकोळ दगडफेकही झाली तसेच दोन जण जखमी देखील झाले होते मात्र यामध्ये गेवराई पोलिसांनी पंडित – पवार यांच्यासह एकूण 40 ते 50 जणांविरोधात गेवराई पोलिसांत गून्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषद निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रीया पार पडत असतांना प्रभाग क्रंमाक 10 येथील उर्दू शाळेत पंडित-पवार हे एकमेकाना भिडले होते त्यानंतर मा आ अमरसिंह पंडित यांचे स्विय साहय्यक अमृत डावकर यांच्यावर देखील हल्ला झाला होता तसेच माजी आ लक्ष्मण पवार यांच्या घरावर किरकोळ दगडफेक देखील करण्यात आली होती यानंतर पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियत्रंणात आनली तसेच आता मतदान प्रक्रीया संपल्या नंतर गेवराई पोलिसांतर्फे रामराव आघाव यांनी फिर्याद दाखल केली आहे यामध्ये जयसिंग पंडित,पृथ्वीसिंह पंडित,बाळराजे पवार,शिवराज पवार,सह 40 ते 50 जणाविरूद्ध गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गेवराई पोलिस सुत्रांनी दिली असून पुढील तपास करीत आहेत.