परिस्थिती नियत्रंणात उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांची माहिती
गेवराई दि 2 ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरूवात झाली 11 वाजेपर्यंत गेवराई शहरातील सर्वच बूथवर शांततेत मतदान प्रक्रीया सुरू होती तसेच गेवराई शहरातील प्रभाग क्रं 10 मधिल उर्दू शाळेत पंडित – पवार हे एकमेकांना भिडले तसेच तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं वाद टळला आहे
या बाबद सविस्तर माहिती अशी की,आ विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वी जयसिंह पंडित तसेच माजी आ लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार या दोघात प्रभाग क्रंमाक 10 मधिल ऊर्दू शाळेतील परिसरात एकमेकांना भिडले व समर्थक ही भिडले त्यानंतर गेवराई शहरात असनाऱ्या मा आ लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यात पंडित समर्थक घूसले तसेच या ठिकाणी पोलिसांनी हस्ताक्षेप केल्यानं अनर्थ टळला तसेच परिस्थिती आता नियत्रंणात आहे तसेच नागरिकांनी भय मुक्त मतदान करावे कूठेही कायदा सुवैस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व आता गेवराई शहरात शांतता आहे असे गेवराईचे पोलिस उप विभागीय अधिकारी अनिल कटके यांनी सांगितले आहे.