राष्ट्रवादीच्या शितलताई दाभाडे यांच्या विजयासाठी नारीशक्ती एकवटली

अमरसिंह पंडित आणि आ‌. विजयसिंह पंडित यांनी केले तगडे नियोजन

 

गेवराई दि.१५( वार्ताहार ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितलताई दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नारीशक्ती एकवटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई नगरपरिषद निवडणूक प्रचाराचे तगडे नियोजन केले आहे. शितलताई दाभाडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितलताई दाभाडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. बोर्डे गल्ली, पवार गल्ली, धनगर गल्ली, रंगार चौक, दाभाडे गल्ली, राम मंदिर परिसर, मोंढा रोड परिसर या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढली. यावेळी गेवराई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितलताई महेश दाभाडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून मला आशिर्वाद देण्याचे आवाहन केले.

यावेळी शितलताई दाभाडे यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी मतदार बंधू भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष पल्लवी गोगुले, किरण दाभाडे, शहर उपाध्यक्ष शीला पैठणे, सचिव अनिता काळे, सरचिटणीस नीता बेद्रे, संगीता घोडके, प्रीती दाभाडे, सीमा होंडे, अनिता खेत्रे, दिपाली मडके, जयश्री दाभाडे, गौरी दाभाडे, मोनिका पंडित, अश्विनी पंडित भावना जैन, किरण दाभाडे, वैष्णवी दाभाडे, आरती गायकवाड योगिता तांबारे, गीता बेद्रे, अनिता काळे, गीता दाभाडे, शोभा औटी, रोहिणी मुळे, शेख रियान, शेख परवीन, नीता डरपे, सुमती पुरणपोळे, वैष्णवी दाभाडे, सोनाली हजारे, अर्चना हजारे, अमृता गायकवाड अलका गायकवाड, सोनाली दाभाडे, सीमा जंवजाळ, त्रिवेणी मुळे यांच्यासह या प्रभागाच्या महिला उमेदवार मंगल आत्माराम हाजारे व उमेदवार श्रीकृष्ण सुमंतराव मुळे सहभागी झाले होते.

या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माऊली पंडित, अभिषेक गायकवाड, ज्ञानेश्वर दाभाडे, सोनू दाभाडे, आदित्य दाभाडे रघुनाथ आतकरे, दिनेश मोटे, विशाल ठाकूर, मनोज हजारे, संदीप मुळे, सचिन मुळे, अमोल मुळे, रोहित मुळे,राजू आंबेभुईकर, गोरख शिंदे, संतोष हेटनाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *