गेवराई शहराच्या सर्वांगीन विकासासाठी माझ्या पदरात मतांचा आशिर्वाद द्या –सौ. शितलताई दाभाडे
गेवराई दि.१२ ( वार्ताहार ) विकासाचा ध्यास असणारे आमचे नेते अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ.विजयसिंह पंडित यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणली आहेत, ती दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी नगर परिषदेची सत्ता आपल्या हाती असते गरजेचे आहे. गेवराई शहराच्या सर्वांगीन विकासासाठी माझ्या पदरात मतांचा आशिर्वाद द्या असे भावनिक आवाहन सौराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई दाभाडे यांनी केले. गेवराई शहरातील मतदारांच्या गाठीभेटी दरम्यान त्या बोलत होत्या.
गेवराई नगरपरिषद निवडणुकी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई महेश दाभाडे यांच्या प्रचारार्थ संजय नगर येथील सय्यद रफिक भाई यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठकीत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की सर्वसामान्य मतदारांना योग्य तो न्याय देण्यासाठी व त्यांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाला संधी द्या गेवराई शहराच्या प्रत्येक प्रभागांमध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते व नाली बांधकाम व दिवाबत्ती यांची योग्य सोय सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक प्रभागांमध्ये वयोवृद्धांना ओपन स्पेस मध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था लहान लहान बालकांना विविध खेळ खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून दिली जातील त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर मताचे दान द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष मुक्ताताई आर्दड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी शहर अध्यक्षा पल्लवी ताई गोगुले, वैष्णवी दाभाडे,सय्यद रुकसाना, सय्यद जेबुनिसा, बिल्कीस बानो, सय्यद नगमा, माधूरी बांडे, नसरीन हरभट, फसी हरभट, अश्विनी बांडे, जयश्री भापकर, रब्बू भाबी, फरवीन शेख, मुमताज शेख, शरीन शेख, जे के बाबू, सय्यद सुभान, निजाम भाई, सय्यद रफीक, नारायण पवार, अमर सय्यद, गफूर पटेल, इम्रान सय्यद, कौसर भाई, पप्पू बांडे, सय्यद सद्दाम, अस्लम शेख, सय्यद हरुन, सय्यद खाजा, शेख हादी, शेख नय्यूम, अफसर भाई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...