गेवराई दि 4 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून विना परवाना वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गून्हे शाखेला मिळाली तसेच बीड जालना रोडवरील तलवाडा फाटा व नाकझरी रोडवर दोन हायवा विनापरवाना वाळूची तस्करी करताना मिळूून आल्या तसेच व त्या दोन्ही हायवा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून गून्हा दाखल केला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना परवाना बेकायदेशीर वाळूची तस्करी केली जाते त्या अंनूषगाने बीड स्थानिक गून्हे शाखा कार्यरत आहे स्थानिक गून्हे शाखेला गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून( दि ४ रोजी) त्यांनी बीड जालना रोडवर तलवाडा फाटा व नाकझरी शिवारात सापळा रचला तसेच दोन हायवा याला हात दाखवत पोलिसांनी गाड्या थांबविल्या तसेच पोलिस आले असल्याचे लक्षात येताच या दोन्ही चालकाने अंधाराचा फायदा घेत घटना स्तळावरून पलायन केले तसेच ह्या दोन्ही वाहनाची पाहणी केली असता यामध्ये वाळू सदृश सामग्री मिळून आली तसेच या दोन्ही हायवा स्थानिक गून्हे शाखेने ताब्यात घेऊन गेवराई पोलिसांत चालक व मालक अश्या चार ईसमाविरूद्ध गून्हा दाखल केला असून या कार्यवाईत अंदाजे ५० लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,स्थानिक गून्हे शाखेचे पोनि शिवाजी बंन्टेवाड,याच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावर,वरपे,राठोड,शिंदे आदिंनी केली असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.