२०० किलो गांजाची झाडे जप्त;स्थानिक गून्हे शाखेची मोठी कामगिरी
गेवराई दि १ ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत धूमेगाव परिसरात असनाऱ्या एका शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती बीड च्या स्थानिक गून्हे शाखला मिळाली तसेच सदर ठिकाणी छापा मारला असता या कार्यवाईत २०० किलो पेक्षा जास्त गांजाची झाडे मिळून आली असल्याने खळबळ उडाली आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील धूमेगाव परिसरात गट क्रं १८९ मध्ये मोठ्या प्रमाणात गांजाच्या झाडाची शेती करण्यात आली होती तसेच शेतात मध्यभागी ही शेती होती तसेच बीडच्या स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाला गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार या परिसरात स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला तसेच यामध्ये अंदाजे २०० ते ३०० किलो गांजाची झाडे आढळून आली असल्याची माहिती स्थानिक गून्हे शाखेच्या सुुत्रांनी दिली आहे तसेच गेल्या दोन दिवसापुरवी चकलांबा पोलिसांनी मालेगाव शिवारात गांज्याची शेतीवर कार्यवाई केली होती नंतर आज ( दि १ रोजी ) सायंकाळी ६ च्या दरम्यान धूमेगाव परिसरात ही मोठी कार्यवाई स्थानिक गून्हे शाखेने केली आहे तसेच आरोपी बाबद अधिक तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गून्हे शाखेने दिली असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधिक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर,पोलिस निरीक्षक एस डी बंन्टेवाड,यांच्या मार्गदशनाखाली चकलांबा प्रभारी सपोनि गडवे,गोंविद राख,पोह विकास राठोड,पोह अंकूश वरपे,पी सी सुनिल राठोड सह स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी,न्यायवैधक पथक यांनी केली आहे.