खोक्याचा सहकारी असलेला महेश कापरे यांचा आरोप चुकीचा

सपोनि संदिप पाटील यांची माहिती

गेवराई दि १६ ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबर मारहानीच्या गून्ह्यात सतिष उर्फ खोक्या भोसले यांचा सहकारी महेश कापरे यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिसांनी कडक व कायदेशीर कार्यवाई केली होती तसेच याप्रकरणात दोन महिणे यापेक्षा जास्त दिवस न्यायलयीन कोठडीत राहणारा महेश कापरे हा आपल्या विरूद्ध केलेल्या कार्यवाईचा राग मनात धरून माझ्या विरोधात तक्रारी करत असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांनी दिली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत तितरवणी मध्ये रहिवाशी असलेला महेश कापरे यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गूरनं 95/2025 यामध्ये तो आरोपी आहे तसेच गून्ह्यात सतिष उर्फ खोक्या भोसले यांचा तो सहकारी आहे तसेच याच आरोपी विरूद्ध चकलांबा पोलिसांनी कडक कार्यवाई केली होती तसेच राज्याचे लक्ष वेधलेल्या या गून्ह्यात सदर आरोपी महेश कापरे याला ७१ दिवस बीड कारागृहात मुक्कामी राहावे लागले असल्याच्या कारणामुळे सदर आरोपी वरिष्ठांकडे तसेच सोशलमिडियावर चुकीचे मजकूर टाकून चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि संदिप पाटील यांच्यावर आरोप करत आहे असे चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि संदिप पाटील यांचे म्हणने असून तसेच सदर आरोपी विरूद्ध कायदेशीर कार्यवाई करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *