चकमो कार्यकर्त्यामुळे नेते मंडळी दिशाहीन

वार्डात नाही काही काम आणि स्टंन्ट बाजिने सोशल मिडीयावर धूमाकूळ

गेवराई दि १२ ( वार्ताहार ) दिपावली नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू होण्याचे संकेत आहेत व नंतर नगर परिषदेच्या निवडणूका होणार आहेत त्याच अनूषंगाने अनेक नेते मंडळी गेवराई शहरात मोर्चे बांधणी करीत असून नेते मंडळी समोर चमको कार्यकार्ते यांनी गऱ्हाडा घातला असल्यामुळे नेते मंडळी दिशाहीन झाली आहे आणि हेच कार्यकर्ते दिशाभूल करण्याचे राजकारण गेवराई शहरात तापू लागले आहे काही कार्यकर्ते यांनी तर हद्दच पार केली आहे आपला वार्ड कसा?आहे किंवा जनतेत यांची कवडीचीही किंमत नाही असे उताविळ शोशल मिडीयावर भावी नगर सेवकाच्या पोस्ट करू लागले आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराईच्या राजकारणात अनेक नेते मंडळी सक्रीय आहेत तसेच त्याचे कामही त्याच्या नेत्यासाठी गोपनिय पद्धतिने सुरू आहे तसेच शहरातील काही ठराविक गटाकडून आम्ही काहीही करू शकतो या भावनेत आहेत तसेच गेवराई शहरातील अनेक विकासांचे प्रश्न प्रलंबित आहेत येणाऱ्या निवडणूकीत आपल्या वार्डात अथवा प्रभागात काय?परिस्थिती आहे सर्वसामान्य नागरिक यांचे कोणते प्रश्न आहेत यांची जाण असनारे कार्यकर्ते अद्यापही आपल्या नेत्यापासून दूरच आहेत चमको कार्यकर्ते यांच्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी यांनी चमको कार्यकर्ते यांना थारा देऊ नये अशी भावना अनेकजन व्यक्त करत आहेत येत्या निवडणूकीत पारदर्शक व विकासाभिमुख नेतृवाला संधी मिळू शकते फक्त चमको पासून नेते मंडळीनी सावध राहावे व प्रामाणिक आणि निष्ठावान यांना न्याय द्यावा अशी भावना निष्ठावान कार्यकर्ते यांच्यातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *