जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व उसाचे गाळप करण्यास आम्ही कटिबद्ध – अमरसिंह पंडित

माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत जयभवानीचा ४३ वा बॉयलर प्रदिपन समारंभ संपन्न

 

गेवराई दि.१२ ( वार्ताहार ) जयभवानी सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात १३ ते १४ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध आहे. त्यापैकी कार्यक्षेत्रातील १४६५६ हेक्टर क्षेत्राची नोंद कारखान्याकडे झालेली असून अंदाजे १० ते ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपास उपलब्ध होणार आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे व सरासरी ११ टक्के साखर उतार्‍याचे उदिष्ट ठरवीले असून कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेल्या सर्व उसाचे शंबर टक्के गाळप करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी जयभवानी सहकारी कारखान्याचे बॉयलर प्रदिपन करताना ते बोलत होते.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ४३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव महाराज यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (दादा)पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार यांच्यासह संचालक सर्वश्री जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, सुनिल पाटील, श्रीराम आरगडे, राजेंद्र वारंगे, संदीपान दातखीळ, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, शरद चव्हाण, भिमराव मोरे, रावसाहेब देशमुख, गणपत नाटकर, जगन्नाथ काळे, बाबुराव काकडे, रहेमतुल्ला पठाण, साहेबराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी ह.भ.प. महादेव महाराज आणि संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॉयलर प्रदिपन करण्यात आले. वेळेत बॉयलरचे काम पूर्ण केल्याबद्दल घनश्याम कादे यांना पाच हजार रुपयांचे पारितोषिक चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मराठवाड्यातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन प्रयत्न करत आहे. कारखान्याच्या माध्यमातून डिसलेरी ११ महिने कशी चालू ठेवता येईल यासाठी प्रयत्न चालू असून शेतकऱ्यांनी उसासोबतच आता फळबागा, रेशीम आधी उत्पादनाला हात घातला पाहिजे. रेशीमचे उत्पादन गेवराईत मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे रेशीमवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करणार असल्याचे सांगून कारखान्यातील कर्मचारी आणि कामगारांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जयभवानीची कार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे कामगारांच्या पगारात सप्टेंबर २०२५ पासून १५ टक्के वाढ करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. कुठल्याही गटातटाचा विचार न करता जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील नोंद झालेल्या शेतकऱ्यांचा ऊस शंभर टक्के उचलला जाईल असे सांगून बँका, कारखाना, शिक्षणसंस्था यात कोणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी शुभेच्छापर आशीर्वाद देताना ह. भ. प. महादेव महाराज म्हणाले की साधू संतांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवाजीराव (दादा) पंडित परिवाराला मिळालेला आहे, दादांनी सामान्य माणसाला सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रगती कशी मिळेल याचा विचार केला. एकमेका साहाय्य करू या सहकाराचा मंत्र प्रत्यक्षात आचरणात आणून जयभवानी साखर साखर कारखान्याची उभारणी केली. त्यामुळे अनेकांच्या घरात, शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती आली. सामान्य माणूस आज जयभवानीकडे सहकारी साखर कारखान्याकडे कामधेनू म्हणून पाहत आहे. सामाजिक कार्यात बरोबरच परमार्थिक काम करताना शिवछत्र परिवारांनी कधीही कुठेही दुजाभाव केला नाही. दादांची पुढची पिढी देखील दादांचा वारसा सक्षम पुणे पुढे घेऊन जात असताना समाजविधायक उपक्रम त्यांच्याकडून राबवले जात आहेत. जयभवानीच्या साखरेची गोडी जगभरात पसरो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात १३ विभागामध्ये ३३ गट कार्यरत असून प्रत्येक विभागवाईज व गटवाईज ऊस जातनिहाय पंधरवाडा वाईज ऊस तोड वाहतूक कार्यक्रम राबविणार आहोत व त्यामध्ये सुधारित जातीच्या व परिपक्व उसाला प्राधान्य देवून तोडणी करणार आहोत त्यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत होवून शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर देता येईल. कारखान्याकडे सद्यस्थितीत इतर बँकाकडील सर्व कर्ज निरंक होवून फक्त एम.ए.स‌.सी.बँकेडील कमी व्याज दराचे कर्ज वगळता कुठलेही कर्ज देय राहिलेले नाही, तसेच कारखान्याकडे कोणत्याही प्रकारची शासकीय देय बाकी राहिलेली नाही असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. यावेळी यावेळी सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, चिफ इंजिनिअर अशोक होके, चीफ इंजिनिअर ऋषिकेश देशमुख, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, मुख्य शेतकी अधिकारी सुदामराव पघळ, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, बॉयलर इंजिनियर मदन अरबे, इन्स्ट्रुमेंट इंजिनियर ज्ञानेश्वर आघव, डिस्टलरी इनचार्ज राजेंद्र बडे, चीफ केमिस्ट श्रीमंत जाधव, सिव्हील इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी एस.एन.औटे, संगणक विभागाचे धनाजी भोसले, खरेदी विभागाचे सुशांत सोळंके, ऊस पुरवठा अधिकारी वच्छिष्ट कुटे, हेड टाईम किपर सचिन उधे, कार्यालयीन अधीक्षक गोविंद चव्हाण, स्टोअर किपर राजेंद्र ढेंगळे, उद्धव पारे, ऋषिकेश शिंदे, महेश गुंजाळ यांच्यासह कामगार, कर्मचारी, अधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *