कपाशीला फळबाग पिक म्हणून घोषीत करावे

मा.आ अमरसिंह पंडित यांची राज्यपाल यांच्या मार्फत सरकारकडे मागणी

 

गेवराई दि १० ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या जन्मदिनाच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यास राज्यस्थान चे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे हे उपस्थित होते तसेच गेवराई तालुक्यात आलेली पुरपरिस्थिती लक्षात घेता कपाशी या पिकाला फळबाग पिक यांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मा आ अमरसिंह पंडित यांनी राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्याकडे केली

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई मतदार संघाचे जनक तथा बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्मपितामहा माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचा अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी राज्यस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे, सहकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजन पाटील,माजी आ विलासराव खरात,ह भ प शिवाजी महाराज,ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर,आ विजयसिंह पंडित,यांची उपस्थिती होती तसेच यावेळी राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी गेवराई मतदार संघाबाबद अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच गेवराई मतदार संघाच्या स्थापणे पासून मी या मतदार संघात येत आहे त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या सोबत काम केले व त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वच्छ प्रतिमेचे राजकारण केले तसेच कूठेही त्यांच्या राजकीय प्रवासात प्रतिमा मलीन होईल असे कृत केले नाही त्यांना उत्तम आरोग्य व लाभो याकरीता मनोभावे सदिच्छा दिल्या तसेच ततपुर्वी संत महतं व प्रास्ताविक पर आ विजयसिंह पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दादाच्या पुण्याईने व गेवराई मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने मी या मतदार संघाचे नेतृव करत आहे तसेच यापुढे गेवराई मतदार संघाच्या विकासाठी मी कटीबद्ध राहिल असे त्यांनी सांगितले तसेच आभार मांडत असतांना गेवराई मतदार संघाचे माजी आ अमरसिंह पंडित यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे गेवराई मतदार संघातील शेतकरी यांचे आतोनात न भरून येणारे नुकसान झाले आहे शेतकरी यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार ने कपाशी या पिकाला फळबाग पिक म्हणून घोषित करावे जेणे करून यांचा फायदा या मतदार संघातील शेतकरी यांना होईल अश्या प्रकारची मागणी त्यांनी महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे यावेळी गेवराई मतदार संघातील हजारो नागरिक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *