भगवानगडाचा आशिर्वाद शिवाजीराव दादांच्या पाठीशी आहे – न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज

गेवराई दि. ९ ( वार्ताहार ) माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या चार वर्षांपासून भक्तीचा सोहळा चालू आहे. शिवाजीराव दादा ८८ वर्षाचे झाले तरी ते आरोग्याबद्दल आणि लोकांप्रती सजग आहे. या वयातही त्यांचे सर्व तालुक्यावर लक्ष आहे. जुन्या काळातील सर्व गडांचे महंत दादांकडे येऊन गेल्यामुळे त्यांचा आशिर्वाद दादांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांना निरोगी आयुष्य मिळाले आहे. दादांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या पाठीशी भगवानगडाचा कायम आशिर्वाद राहतील असे भावोद्गार भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी काढले. शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवाला नामदेव शास्त्री यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानभगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी भेट दिली. यावेळी शिवछत्र परिवाराच्या वतीने जयसिंग पंडित यांनी शास्त्रींचा सत्कार केला. शास्त्रीजींनी शिवाजीराव दादांचा सत्कार करुन त्यांना शुभाशिर्वाद दिले. यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, ह.भ.प. निंबाळकर, प्रकाश सुस्कर यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *