पंडित – पवार देणार का? निष्ठावतांना न्याय नगर अध्यक्ष पदासाठी;सौ सिमा मोटे,सौ रत्नमाला मोटे,यांची नावे आघाडीवर

 

गेवराई दि ८ ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेच्या निवडणूकीचे नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार ह्या खुल्या वर्गातील महिला असनार आहेत यांच पार्श्वभूमिवर आता निकटवर्तीय व निष्ठावान यांची वर्णी लागेल का?असा प्रश्न चर्चिला जात असून मा आ अमरसिंह पंडित गटातून सौ सिमा बंडू मोटे तर मा आ लक्ष्मण पवार गटाकडून सौ रत्नमाला शरद मोटे यांची नावे आघाडीवर आहेत तसेच मा आ बदामराव पंडित गटातून अद्याप तरी नगरअध्यक्ष पदासाठी प्रबळ चेहरा समोर आला नाही.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषदेची सत्ता गेल्या तिन दशकापासुन पवार घराण्याकडे आहे नगर सेवक,नगर अध्यक्ष ,आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे तर दूसरीकडे गेवराई तालुक्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून मा आ अमरसिंह पंडित हे जोरदार पणे गेवराई शहराच्या राजकारणात इंन्ट्री करणार आहेत विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर ते देखील गेवराई नगर परिषदेच्या राजकारणात सक्रीय आहेत माजी मंत्री बदामराव पंडित गट कोणत्या पक्षाकडून पॅनलचे नेतृव करतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे तसेच गेवराई शहरात पवार व पंडित कुटूंबियाच्या खाद्यांला खादा लावून सौ सिमा बंडू मोटे व सौ रत्नमाला शरद मोटे,यांनी विधानसभा निवडणूकीत मोलाची धूरा संभाळली आहे तसेच येत्या नगर परिषदेच्या निवडणूकीत पक्ष व नेते मंडळी यांना संधी देतील का?अशी चर्चा जोर धरू लागली असून प्रस्तापित उमेदवार आल्यास त्याला मतदार पंसती देतील का? नाही अशी देखील चर्चा राजकीय वर्तूळात केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *