आ.विजयसिंह व अमरसिंह पंडित पुरग्रस्तांच्या मदतीला सरसावले
शारदा प्रतिष्ठानच्या वतीने पुरग्रस्तासाठी मदत केंद्र
गेवराई, दि. २९ ( वार्ताहार ) जायकवाडी धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीकाठावर गंभीर पुर परिस्थिती निर्माण झाली, गेवराई विधानसभा मतदार संघातील चाळीस गावांमध्ये त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाकडुन या बाबतची माहिती मिळताच माजी आमदार अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदीकाठच्या गावांना भेटी देवुन संभाव्य पुर परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन रामपुरी, तलवाडा, दैठण, मालेगांव यासह आदी ठिकाणी मदत केंद्र सुरु केले. शारदा प्रतिष्ठानच्या मदत केंद्रांमध्ये पुरग्रस्त नागरीकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसात सुमारे दहा हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था शारदा प्रतिष्ठान कडुन करण्यात आली. आ. विजयसिंह पंडित यांनी टाकरवण भागातील गावांना तर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बोरगांव पासुन खामगांव पर्यंतच्या पुरग्रस्त गावांना भेटी देवुन नागरीकांशी संवाद साधला.
जायकवाडी धरणातुन रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सुमारे तीन लाख क्युसेस पेक्षा जास्तिचे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरग्रस्त भागातील लोकांना गावाच्या बाहेर सुरक्षितस्थळी काढण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावुन शिवछत्र परिवार रात्रीचा दिवस करुन झटत होता. रात्री उशिरा पर्यंत हे काम सुरु होते. सन २००६ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित आणि संपुर्ण शिवछत्र परिवार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी झटत आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन तात्काळ रामपुरी, तलवाडा, दैठण आणि मालेगांव येथे मदत केंद्र स्थापन करुन तेथे पुरग्रस्त नागरीकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे दोन हजार हुन अधिक नागरीक या मदत केंद्रात दाखल झाले होते.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सोमवार दि. २९ रोजी सकाळी गोदावरी नदीकाठी बोरगांव, गुंतेगांव, पाथरवाला, गुळज, सुरळेगांव आदी ठिकाणी भेटी देवुन पुरग्रस्त नागरीकांची अस्थेवाईकपणे चौकशी केली. आ. विजयसिंह पंडित यांनी राजेगांव, गव्हाणथडी, टाकरवण, काळेगांव, हिवरा, कवडगांव, रिधोरी, रामपूरी, राजापूर आदी ठिकाणी तसेच युवानेते रणवीर पंडित यांनी दैठण, सावळेश्वर, भोगलगांव, गंगावाडी, राहेरी आदी पुरग्रस्त गावांना भेटी देवुन त्यांची अस्थेवाईकपणे चौकशी करुन पुरग्रस्तांना धीर दिला. प्रशासकीय अधिकारी आणि नागरीक यांचा समन्वय करुन प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संकटकाळात पुरग्रस्तांच्या पाठीशी शिवछत्र परिवार खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी दाखवुन दिले. राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगांव, रेवकी यासह आदी ठिकाणच्या पुरग्रस्त नागरीकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था शारदा प्रतिष्ठान कडुन करण्यात आली.
सन २००६ च्या महापुर परिस्थितीला तोंड देतांना शारदा प्रतिष्ठानने केलेल्या कार्याची आठवण अनेक पुरग्रस्त नागरीकांनी यावेळी काढली. शिवछत्र परिवाराच्या माध्यमातुन संकटकाळी होत असलेल्या मदतीच्या अनुषंगाने पुरग्रस्त नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...