पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह शिवछत्र परिवार सरसावला
सिंदफणा आणि गोदाकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे – आ. विजयसिंह पंडित यांचे आवाहन
एनडीआरएफ सह सैन्यदलाची टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल
गेवराई, दि.२३ (वार्ताहार ) – गेवराई विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचे संपर्क तुटले असून सिंदफणा नदीच्या पात्रात ठिकठिकाणी अनेक लोक अडकल्याचे चित्र आहे. या गंभीर परिस्थितीत आ. विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह संपुर्ण शिवछत्र परिवार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. मौजे नांदुर हवेली येथे रात्री सव्वाबारा वाजता पुरात अडकलेल्या १६ नागरीकांची सुटका आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ ची टीम आणि प्रशासन यासाठी प्रयत्न करत होते. आ. पंडित यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना थेट संपर्क करून पूरपरिस्थितीचे गांभीर्य सांगून मदत कार्याची माहिती दिली. ना. पवार यांच्या निर्देशाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ सह सैन्यदलाची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. आ. पंडित यांनी सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये गोदावरी आणि सिंदफणा नदीने उग्ररुप धारण केल्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह संपुर्ण शिवछत्र परिवार पूरग्रस्त भागात ठाण मांडून उभे आहेत. आ. विजयसिंह पंडित यांनी पिंपळगाव कानडा, आहेरचिंचोली, खामगाव आणि नांदूर हवेली या सिंदफणा नदीच्या पाण्याने वेढलेल्या परिसरात पुरात अडकलेल्या अनेक लोकांची प्रशासनाच्या मदतीने सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके, तहसिलदार संदिप खोमने यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. आ. पंडित यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या, त्यानंतर एनडीआरएफ च्या २६ जवानांची टीम सोमवारी रात्री उशिरा कार्यरत झाली. गाळ, चिखल आणि पाण्यातून त्यांनी पुरात अडकलेल्या नांदुर हवेलीतील १६ नागरीकांची सुखरूप सुटका केली. रात्री उशिरापर्यंत आ. विजयसिंह पंडित घटनास्थळी ठाण मांडून होते. सुटका झालेल्या नागरीकांनी आ. पंडित यांचे गहिवरून आभार व्यक्त केले.
मौजे कुर्ला येथील भिल्ल वस्तीवर अडकलेल्या सुमारे पन्नासहून अधिक रहिवाशांची सैन्य दलाच्या जवानांनी सुटका केली. पिंपळगाव कानडा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागणार होती मात्र माजलगाव येथील कहार समाजाच्या बांधवांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांची सुटका केली. नांदुर हवेलीतील सरवदे कुटूंबातील सुमारे ७ सदस्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफच्या जवानांनी केले. मौजे सिरसमार्ग येथील शेतात अडकलेल्या वयोवृध्द दोन नागरीकांची एनडीआरएफ च्या जवानांनी सुखरूप सुटका केली. यापैकी बहुतांशी ठिकाणी आ. विजयसिंह पंडित उपस्थित होते. त्यांनी यावेळी ग्रामस्थ, पूरग्रस्त आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय करून तत्परतेने अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला. मागील दोन दिवसांपासून आ. विजयसिंह पंडित अविरतपणे पूरग्रस्त भागात सर्वदूर फिरून सर्वसामान्य लोकांना आधार आणि धिर देण्याचे काम करीत आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच सिंदफणा नदीला एवढा मोठा महापूर आल्याचे जुने लोक सांगत आहेत. अभूतपुर्व पूर परिस्थितीमध्ये संपूर्ण शिवछत्र परिवार लोकांच्या मदतीला धावून जात आहे. गोदावरी आणि सिंदफणा नदीची पाणी पातळी वाढत असून रात्री पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...