वंचितच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी अजयकुमार गायकवाड यांची निवड
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) गेल्या काही महिन्यापासुन वंचितची तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती तसेच याठिकाणी भारिपचे माजी तालुका अध्यक्ष अजयकुमार गायवाड यांना वंचितच्या गेवराई तालुका अध्यक्षपदांची जबाबदारी देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रक वंचितच्या मध्यवर्ती कार्यलयातून काढण्यात आले आहे यामध्ये संपुर्ण तालुका कार्यकारणी निवडण्यात आली असल्याचे अधिकृत पत्र प्रभारी प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिले असुन जुन्या पदअधिका-यांपैकी महासचिव किशोर भोले संघटक रंजित शिंदे प्रसिद्धी प्रमुख पदी ज्ञानेश्वर हवाले यांची फेर निवड करण्यात आली असुन उर्वरीत कार्यकारणीत नवख्या कार्यकर्ते यांना देखील काम करण्याची संधी दिली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...