बंगला नावावर करायचा तगादा;पुजा गायकवाडने बोलणं बंद केल्यानं गोविंदने केली आत्महत्या

नृतिका पुजा गायकवाडला बेड्या

 

गेवराई दि १० ( वार्ताहार ) एका कला केंद्रात असनाऱ्या नृतिकेच्या प्रेमात पडला आणि तिने त्याच्याशी बोलणं बंद केल्याच्या नैराशातून लुखा मसला गावचे माजी उप सरपंच गोविंद जग्गनाथ बरगे ( वय ३८ ) यांनी पिस्तूलची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना (दि ८ रोजी ) सासुरे गावात घडली व या घटनेला नृतिका असनाऱ्या पुजा गायकवाड ही कारभूत असल्याची तक्रार गोंविदच्या नातेवाईक यांनी दिली असून या प्रकरणी नृतिका पुजा गायकवाड हीला वैराग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पंचायत समितीत ऑपरेटर म्हणून कार्यरत असनारा एका मित्रासोबत गोविंद बर्गे हा कला केंद्रात जात होता त्याचं ठिकाणी असनाऱ्या पुजा गायकवाड हीच्या सोबत गोविंदची ओळख झाली आणि गोविंद तिच्या प्रेमात पडला गत एक वर्षापासून तो सतत तिच्याकडे जात असायचा मी तूमची मालकीण आहे अशी पुजा गोविंदला संबोधदायची तसेच त्यांनेही तीला सोन्याच्या दागिण्यासह,घर,जमिन,आणि प्लॉट,भावाला बूलेट गाडी यासह अनेक महागड्या वस्तू मोबाईल असे गोविंद कडून उकळले तसेच गेवराई याठिकाणी गोविंद याने पुजाला घेऊन आल्यानंतर गोविंदचा बंगला पुजाला आवडला आणि बंगला नावावर करण्यासाठी तिने गोविंदकडे तगादा लावण्यास सुरूवात केली गोविंदने बंगला नावावर करण्यास नकार दिला माझे आई वडिल व समाजात माझी अब्रू जाईल असे गोविंदने पुजाला सांगितले तीने यावर गोविंदला खोट्या बलात्काराच्या गून्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली तसेच पुजाने गोविंदशी संपर्क तोडला व गेल्या दोन दिवसापुर्वी गोविंद पुजा ज्या कलाकेंद्रात असते त्याठिकाणच्या मॅनेजर याला सांगितले पुजाला मला बोलण्यास सांगा निरोप गेल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याने गोविंदने तिच्या मैत्रीनिशी संपर्क केला परंतू पुजा गोंविदला बोलण्यास नकार देत होती आणि शेवटी गोविंद पुजा ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या सासुरे गावात घरी गेला आणि तिच्या आईला पुजाला समाजावून सांगण्यास बोलत होता तसेच तिच्या आईने पुजाला व्हिडीओकॉल करूण गोविंदशी बोलणं करून दिलं परंतू पुजाने त्यावेळी देखील गोविंदला प्रतिसाद दिला नाही गोविंदने सांगितले की,मी स्वत;ला संपवून घेईन तरीही तिने त्यांचे ऐकले नाही याच दरम्यान गोविंद बर्गेने पुजा गायकवाडच्या घराच्या परिसरात आपल्या गाडीत बसून स्वत;च्या डोक्यावर गोळी झाडून घेतली व आत्महत्या केली असल्याची फिर्याद गोविंदच्या मेहूणा याने पोलिसांत दिली आहे तसेच नृतिका पुजा गायकवाड हीच्या विरूद्ध वैराग पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून तिला रात्रीच अटक केली आहे तसेच ज्या बंदूकीने गोंविदने स्वत;वर गोळी झाडली याबाबद वैराग पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *